मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम उप अभियंता ठाकरे यांची घेतली भेट…

कुंब्रल फाटा ते मोरगाव रस्त्या संदर्भात दिले निवेदन:पंधरा दिवसात योग्य ते काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.२०-: आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता ठाकरे यांची भेट घेत कुंब्रल फाटा ते मोरगाव रस्त्या संदर्भात निवेदन दिले. ह्या रस्त्यामुळे होणारे अपघात आणि डागडुजी केल्यानंतरही रस्ता उखडून खड्डे पडल्याचे मनवीसे जिल्हा सचिव निलेश देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. येत्या पंधरा दिवसात योग्य ते काम न झाल्यास जिल्हा परिषद उप अभियंता सावंतवाडी कार्यालयासमोर येथील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.


मागील एप्रिल महिन्यात मनविसे कडून कुंब्रल फाटा ते मोरगाव या रस्त्या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती, पण सद्यस्थितीत डागडुजी केल्यानंतरही सदर रस्ता खड्डेमय असून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना व वृद्ध व्यक्तींना याचा त्रास होत आहे. तसेच वेळोवेळी अपघाताला आमंत्रण देत असल्याचे निदर्शनास येत आहे, तरी सदर बाब आज मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांचा नेतृत्वाखाली जिल्हा परिषद उपअभियंता कार्यालयात धडक देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद उपअभियंता श्री ठाकरे यांनी उद्या स्वतः जात त्या ठिकाणी त्या रस्त्याची पाहणी करणार असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले व रस्ता मंजूर झाला असून येत्या काही दिवसात त्याचे पूर्णतः काम सुरू होणार असल्याचे ग्वाही उपअभियंतांनी मनसे शिष्ट मंडळाला दिली तरी येत्या पंधरा दिवसात योग्य ते काम न झाल्यास जिल्हा परिषद उप अभियंता सावंतवाडी कार्यालयासमोर येथील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनविसे पदाधिकाऱ्यांनी दिला
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार जिल्हा सचिव निलेश देसाई तालुकाध्यक्ष संदेश सावंत ग्रा.प सदस्य अक्षय पारसेकर सचिव मनोज कांबळी राज धवण अमोल पार्सेकर बाळू सावळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page