शासकीय आधारभूत भात खरेदीचा तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

तर शासकीय भात खरेदी केंद्राचा माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते शुभारंभ..

⚡वैभववाडी ता.२० संजय शेळके-: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय आधारभूत भात खरेदीचा शुभारंभ वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते पोत्याचे पूजन करून करण्यात आला. तर भुईबावडा येथे शासकीय भात खरेदी केंद्र शुभारंभ माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, व्हॉइस चेअरमन अंबाजी हुंबे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, संघाचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, पुंडलिक साळुंखे, संजय रावराणे, जयसिंग रावराणे, उज्वल नारकर, श्री. परब सर सचिन तावडे, सूर्यकांत बोडके, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, महेश रावराणे, गजानन पाटील,सोसायटी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
यावर्षी आॕनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जाणार आहे. प्रती किलो २१.८३ पैसे या दराने भात खरेदी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी तालुका खरेदी विक्री संघाकडून प्रति किलो २०.४० पैसे दराने ६८१ टन भात खरेदी करण्यात आले होते. त्यातुन तालुक्यातील ४५१ शेतकऱ्यांना १ कोटी ३९ लाख रुपये मिळाले होते. या शिवाय शासनाकडून प्रती हेक्टर १५ हजार रुपये बोनस देण्यात आला. तर यावर्षी शासनाने प्रतिहेक्टर 20000 रुपये बोनस ची घोषणा केली आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघाकडे भात देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.
आतापर्यंत तालुक्यातील ३३५ शेतकऱ्यांनी आॕनलाईन नोंदणी केली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यत नोंदणीची मुदत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन नोंदणी करावी. असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page