धूप बंधारे, रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामांचा आ नाईक यांच्याहस्ते शुभारंभ…

आ नाईक यांच्या प्रयत्नातून निधी झाला आहे मंजूर..

मालवण दि प्रतिनिधी

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तालुक्यातील दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे समुद्री धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये, वायरी दांडी येथील मोरेश्वर राज नाल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ५६ लाख व चौके बावखोलवाडी रस्ता, चौके कुळकरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरणासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व कामांची भूमिपूजने शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाली. अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी असलेल्या या कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी: मंदार ओरोसकर, बाबी जोगी, महेश जावकर, किरण वाळके, सेजल परब, सन्मेश परब, दीपा शिंदे, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, माधुरी प्रभू नीनाक्षी शिंदे, सुर्वी लोणे, अंजना सामंत, राजन नागवेकर, विठ्ठल केळुसकर, गणेश आचरेकर, संजू धुरी, विनोद परब, गिरीधर आचरेकर, बाळा खराडे, प्रवीण मेस्त, अरविंद आचरेकर, कांता येरागी, विष्णू जोशी, सुरज लोणे, पायल आढाव, मेघा खराडे, नेत्रा शिंदे, सौ. साटेलकर, मुग्धा खराडे, प्रिया धुरी, देवीका परब, कांचन तारी, स्नेहल धुरी, तर मोरेश्वर रांजनाला येथे मंदार आडकर, सुंदर चांदेरकर, रवी चांदेरकर, उपेंद्र तोडणकर, भाई तारी, रोहन सरमळकर, रोहन चिंदरकर, सचिन आडकर, चंदू खोबरेकर, गणेश भगत, बबलू तारी, सुशांत चांदरकर, संतोष ढोके, यश चांदेरकर, भाऊ मालंडकर, हिमेश भगत, जयदेव लोणे, तसेच चौके कुळकरवाडी येथे रमू चौकेकर, गोट्या सावंत, सुरेश गावडे, उदय गावडे, भाऊ गावडे, श्रीपाद गावडे, राजा नाईक, दाँदा गावडे, बाबल गावडे, विशाल गावडे, सतीश गावडे, अभिनव सकपाळ व चौके बावखोलवाडी येथे ग्रा.पं. सदस्य शिवदास मांजरेकर, सुरेश कामत, गोपाळ मांजरेकर, सदानंद मांजरेकर, संतोष जाधव, संतोष कदम, धनंजय वराडकर, गोपाळ पाताडे, सुनील पाताडे, विजय पोळ, विनया पोळ, हर्षल खडपे, सुहास मांजरेकर, महेश जाधव, हेमंत गावडे, प्रणाली जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page