सावंतवाडी येथे वेगवेगळ्या वयोगटातील बॅडमिंटन स्पर्धा संपन्न…

रोटरी क्लब, स्नेह नागरी पतसंस्थ, मॉनिग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-: रोटरी क्लब सावंतवाडी, स्नेह नागरी पतसंस्था व मॉनिग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पंचम खेमराज काॅलेज हॉल व जिमखाना हॉल येथे वेगवेगळ्या वयोगटातील भव्य बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचे उद्‌घाटन पंचम खेमराज महाविद्यालय हॉल येथे प्राचार्य दिलीप भारमल सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी अध्यक्ष सुहास सातोसकर, स्नेह पतसंस्था अध्यक्ष अनंतराव उचगांवकर, माॅर्निग बॅडमिंटन क्लब अध्यक्ष नंदकुमार प्रभुदेसाई, रोटरी सेक्रेटरी प्रविण परब, रोटेरियन आबा कशाळीकर, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
या स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे-१२ वर्षाखालील मुली – विजेती – शरयु चुबे, उपविजेती – लावण्या केसरकर, १२ वर्षाखालील मुले – विजेता – तनिष्क वारिक, उपविजेता-ऋषांक कुलकर्णी, १७ वर्षाखालील मुली विजेती – गौराई खवणेकर, उप विजेती – हेतल शिरोडकर, १७ वर्षाखालील मुले – विजेता- कुणाल नारकर, उपविजेता – जयेश कर्ले, महिला खुला गट – विजेती – शरयु चुबे, उपविजेती – श्रेया सामंत, ५५ वर्षावरील पुरुष गट दुहेरी विजेते -राजेश रेडीज व जो डिसोजा, उपविजेते- उमेश नाटेकर व अवदुत कळसुलकर, पुरुष एकेरी विजेता- अर्थव पोरे, उपविजेता – मनिष कर्पे, उत्तेजनार्थ – अमोध आजगावकर व निखील गव्हाळी, पुरुष दुहेरी विजेते – अनमोल गिरप व ऋषी रेडकर, उपविजेते – स्वप्नील सावंत व ओंकार कडू, उत्तेजनार्थ – सोम गांगण व जयेश कर्ले, निखील गव्हाळी व अर्थव पोरे यांनी यश मिळविले. तसेच या स्पर्धेत उद‌योन्मुख खेळाडू म्हणुन प्रधुम्न जाधव व श्रेयस रांगणेकर तर साईप्रसाद सामंत व ऋषांक कुलकर्णी या दुहेरी जोडीला गौरविण्यात आले. बक्षीस सभारंभ माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते जिमखाना बॅडमिटन कोर्ट येथे पार पडला. यावेळी सुहास सातोसकर, अनंतराव उचगांवकर, नंदकुमार प्रभुदेसाई, दिलीप गिरप, प्रविण परब ,आबा कशाळीकर, रोटरीयन सौ अनघा रामाणे , राजेश रेडीज, केतन आजगावकर, दिलीप म्हापसेकर आदी उपस्थित होते . या स्पर्धेत पंच म्हणून केतन आजगावकर, नंदकुमार प्रभुदेसाई, धनंजय परब व अमोध आजगावकर यांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page