प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर उद्या सावंतवाडीत…

भोसले नाॅलेज सिटीला देणार भेट; दिवसभर विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम.

सावंतवाडी ता.१९-: येथील भोसले नॉलेज सिटी मध्ये जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर उद्या 20 रोजी भेट देण्यात असून संपूर्ण दिवसभर भोसले नॉलेज सिटी मध्ये विद्यार्थी केंद्रित विविध कार्यक्रम पार पडणार आहे. संस्थेमार्फत त्यांचे आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात येणार आहे.
डाॅ. माशेलकर हे पुर्ण दिवस भोसले नाॅलेज सिटीत असणार आहेत. यामध्ये विविध विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विज्ञान प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले.

You cannot copy content of this page