Headlines

मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी भोंसले यांनी विदयार्थ्यांच्या कौशल्याची केली प्रशंसा;पालक व शिक्षकांचे मानले आभार…

⚡सावंतवाडी ता.१८-: सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. सोलो डान्स स्पर्धेत पहिली ते इयत्ता नववी ची मुले बहुसंख्येने सहभागी झाली.

लोकनृत्य, कथ्थक, लावणी, भरतनाट्यम, हिपहॉप, कन्टेम्पररी, घुमरनृत्य बॉलिवूड डान्स इ. विविध नृत्यप्रकार जोशपूर्ण वातावरणात सादर झाले. कलाविष्कार सादर करून उपस्थित दर्शकांची वाहवा मिळवली.

सदर नृत्य स्पर्धेसाठी प्रतिथयश नृत्यांगना कु. पुजा राणे यांनी परिक्षक म्हणून भुमिका बजावली. यावळी संस्थेच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांनी विदयार्थ्यांच्या नृत्य कौशल्याची प्रशंसा केली तसेच विदयार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या पालक व शिक्षकांचे आभार मानले.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. प्रेरणा भोसले, श्रीम. रमणी गावडे, श्री. प्रशांत गावकर, श्री. गोविंद प्रभू, श्री. भुषण परब यांनी विशेष मेहनत घेतली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विदयार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे शिक्षक श्री. गोविंद प्रभू व आभार सहशिक्षिका श्रीम. इंतिझिया फर्नाडीस यांनी मानले.

सी.एस. जिल्हा. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, अध्यक्ष श्री राणीसाहेब श्रीमती. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराजनी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनुजा साळगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारिणी सदस्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page