ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ; नगरोत्थान मधून मंत्री दीपक केसरकारांकडून तीन लाखाचा निधी मंजूर..
⚡सावंतवाडी ता.१८-: येथील गरड अल्ली पाणंद येथील मोरी बांधकाम कामासाठी नगरोत्थान मधून नामदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमांतून तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामाचा शुभारंभ येथील ज्येष्ठ नागरिक श्री.सावंत गुरुजी आणि आदम भाई शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शिवसेना (शिंदे गट )शहरप्रमुख बाबू कुडतरकर उपशहरप्रमुख सुजित कोरगावकर,महिला शहरप्रमुख सौ. भारती मोरे , माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,विशाल सावंत,उमेश पाटणकर, बाबासाब शेख,अभिषेक सावंत आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

