निरवडे येथील संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ…

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ:मंत्री दिपक केसरकर यांच्या कडून ५ लाखाचा निधी मंजूर..

⚡सावंतवाडी ता.१८-: निरवडे-माळकरवाडी जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून ५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, माजी सरपंच हरि वारंग, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रमोद गावडे, मुख्याध्यापिका सुजाता सावंत, शिक्षक आपटे, संदेश सोनुर्लेकर, धोंडू माळकर, संभाजी माळकर, संतोष माळकर, गौरव माळकर, रोहन माळकर, गोविंद माळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page