मनसे आक्रमक: कार व दुचाकीवरून होणारी अवैध वाहतुकीवर तात्काळ कारवाई करा; अन्यथा आंदोलन..
⚡सावंतवाडी ता.१८-: सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट चालू आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने आजची युवा पिढी या स्वस्त मिळणाऱ्या दारूमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याच प्रमाणे कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने अवैध्य दारू व्यवसाय करणारे या आजच्या तरुण पिढी व विद्यार्थ्यांना वाहने तसेच खर्चाला पैसा देत या धंद्यात ओढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.येथील बांदा एक्साईज कार्यालयावर धडक देत मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दरम्यान गेल्या वर्षी याच एक्साइस ऑफिस वर या दारू धांद्याविरोधात डबे वाजवा आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या गाड्यातून होणारी दारू वाहतूक पकडून त्यावर कारवाई करण्यात आली. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई झाल्याचे दिसून येते पण या मोठ्या कारवाया करीत असताना जी आज गावागावातून व शहरातून चोरटी दारू आणून विकली जाते त्याच्यावर मात्र कोठेही कारवाई होताना दिसत नाही. मोठ्या कारवाया तुम्ही कराच पण त्याचबरोबर चारचाकी व दुचाकी गाड्यावरून होणारी या गोवा बनावटीची विषारी दारू वाहतूक रोखून आज आपली जी युवा पिढी व्यसनाधीन होत आहे त्याला वेळीच आवर घालण गरजेचं आहे.
तरी आज गावागावातून तसेच शहरातील चालणारा दारू व्यवसायाबाबत एक्साईज ऑफिस, पोलीस खाते , गावातील पोलीस पाटील, दक्षता समिती यांनी एकत्र येऊन या अवैध्य धंद्यांचा वेळीच बंदोबस्त करून युवा पिढीला तसेच विद्यार्थ्यांना व्यसनाधीन व वाममार्गाला जाण्यापासून वाचवावे आशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच कारवाईत सातत्य दाखवा व चुकीच्या पद्धतीने होणारी वाहतूक थांबवा अन्यथा गावागावात तसेच शहरात चालणाऱ्या या अवैध्य दारू धांद्या विरोधात मनसेला आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडाव लागेल असा इशारा उपस्थित मनसैनिकानी दिला.
यावेळी मनसे विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे विजय जांभळे मा शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे ग्रा.प सदस्य आदेश सावंत विद्यार्थीसेना जिल्हासचिव निलेश देसाई विद्यार्थीसेना शहराध्यक्ष स्वप्निल जाधव रघुनाथ खोटलेकर गिरगोल दिया विद्यार्थीसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक रुपेश गुळेकर सुनील नाईक पंकज देसाई आदी उपस्थित होते.
