पंचायत समितीसमोर एकजूट ; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.
⚡सावंतवाडी ता.१८-: राज्यव्यापी ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनात सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती समोर निदर्शने करून गटविकास व्हीएम नाईक यांना निवेदन दिले.
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.१८.१९,२०, डिसेंबर २०२३ रोजी या कालावधीत जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचारी ग्रा.पं. स्तरावरील सर्व कामे बंद ठेवुन तीन दिवस कामबंद आंदोलन करणार आहेत.असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आंबेकर, तालुकाध्यक्ष हनुमान केदार, सचिव अशोक जाधव, उपाध्यक्ष सचिन पारधी , कृष्णा सावंत, न्हानु घाटकर, प्रदीप गावडे, आनंद कुंभार, संतोष कवठणकर, सतीश तोरस्कर, महीला कर्मचारी महानंदा मेस्री, प्रशा कदम, मयुरी नाईक यासह ग्रामपंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते.

