वैभववाडी केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा विद्यामंदिर सांगुळवाडी नं 1 येथे उत्साहात संपन्न…

⚡वैभववाडी ता.१५संजय शेळके-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव अंतर्गत वैभववाडी केंद्रस्तरीय स्पर्धा दोन दिवस विद्यामंदिर सांगुळवाडी नं 1 या शाळेत अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम सांगुळवाडी गावच्या सरपंच पूजा रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर एडगांव वायंबोशी सरपंच रविना तांबे, नावळे सरपंच सोनल गुरव, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, सांगुळवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर रावराणे, वैभववाडी नं 1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके, एडगाव नं 1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे, एडगाव तांबेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सायली घाडी, बाळाजी रावराणे, प्रकाश पाटील, मटकर, तावडे, मुख्याध्यापिका स्नेहलता रावराणे, क्रीडाप्रमुख रणजीत पाताडे, पूनम कदम, दर्शना सावंत, नाना तांबे, दिप्ती पाटील, अनंत चव्हाण, संतोष भरडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवशीय क्रीडास्पर्धेमध्ये वैभववाडी केंद्रबल गटातील 12 प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये पहिल्या दिवशी मैदानी तर दुसर्या दिवशी ज्ञानी मी होणार,समूहगान व समूहनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये क्रीडाप्रकार निहाय पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. लहान गट मुलगे- 50 मी. धावणे: प्रथम अनिष गणेश पाटेकर-वि मं वाभवे, द्वितीय चिन्मय शिवाजी बोडेकर- वैभववाडी नं 1, तृतीय शुभम आकाराम गुरव-नावळे धनगरवाडा, 100 मी धावणे: प्रथम देवराज रमेश बाबर- एडगांव नं 1, द्वितीय मनिष सुनिल डांगमोडेकर- वैभववाडी नं 1, तृतीय वैभव सुभाष गुरव- नावळे धनगरवाडा, उंचउडी: प्रथम वैभव सुभाष गुरव- नावळे धनगरवाडा, द्वितीय आदित्य लखन जाधव-वैभववाडी नं 1, लांबउडी: प्रथम कौशल्य संतोष रावराणे- सांगुळवाडी नं 1, द्वितीय विवेक किरणकुमार चौगले- वाभवे नं 1, 50×4 रिले: प्रथम वाभवे नं 1, द्वितीय सांगुळवाडी नं 1, कबड्डी: प्रथम वैभववाडी नं 1, द्वितीय एडगांव नं 1 लहान गट मुली- 50 मी. धावणे: प्रथम श्रीया विजय मरळकर -वि मं वाभवे, द्वितीय हिमानी दिपक मोरे-सांगुळवाडी नं 1, तृतीय चैताली प्रकाश रावराणे- सांगुळवाडी नं 1, 100 मी धावणे: प्रथम दुर्गा रविंद्र मोरे- सांगुळवाडी नं 1, द्वितीय नेत्रा मारुती गुरव – नावळे धनगरवाडा, तृतीय गौरवी अरूण एकावडे- वैभववाडी नं 1, उंचउडी: प्रथम चैताली प्रकाश रावराणे- सांगुळवाडी नं 1, द्वितीय शुभ्रा अजय गुरव- एडगांव नं 1, लांबउडी: प्रथम हिमानी दिपक मोरे-सांगुळवाडी नं 1, द्वितीय गौरी सत्यवान सुतार- सांगुळवाडी नं 1, 50×4 रिले: सांगुळवाडी नं 1, द्वितीय नावळे धनगरवाडा, कबड्डी: प्रथम सांगुळवाडी नं 1, द्वितीय नावळे धनगरवाडा, ज्ञानी मी होणार: प्रथम- दत्त विद्यामंदिर वैभववाडी नं 1, द्वितीय- श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नं 1, समूहगान: प्रथम- सांगुळवाडी नं 1, द्वितीय- वैभववाडी नं 1, समूहनृत्य: प्रथम- वैभववाडी नं 1, द्वितीय- एडगांव नं 1
मोठा गट मुलगे- 100 मी. धावणे: प्रथम अरूण आकाराम गुरखे -वि मं नावळे धनगरवाडा, द्वितीय निरज निलेश गुरव – वि मं नावळे धनगरवाडा, तृतीय श्रेयश ज्ञानेश्वर राठवड- सांगुळवाडी नं 1, 200 मी धावणे: प्रथम नैतिक मारुती गुरव- नावळे धनगरवाडा, द्वितीय चैतन्य संजय रावराणे – सांगुळवाडी नं 1, तृतीय श्रेयश ज्ञानेश्वर राठवड- सांगुळवाडी नं 1, उंचउडी: प्रथम नैतिक मारुती गुरव- नावळे धनगरवाडा, द्वितीय श्रेयश ज्ञानेश्वर राठवड- सांगुळवाडी नं 1, तृतीय ऋतिक दशरथ गुरव- नावळे धनगरवाडा, लांबउडी: प्रथम ऋतिक दशरथ गुरव नावळे धनगरवाडा, द्वितीय चैतन्य संजय रावराणे – सांगुळवाडी नं 1, तृतीय श्रेयश ज्ञानेश्वर राठवड- सांगुळवाडी नं 1, गोळाफेक: प्रथम नैतिक मारुती गुरव- नावळे धनगरवाडा, द्वितीय ऋतिक दशरथ गुरव- नावळे धनगरवाडा, मोठा गट मुली – 100 मी. धावणे: प्रथम दिशा दिपक सुतार – सांगुळवाडी नं 1, द्वितीय आर्या राकेश पाटील – सांगुळवाडी नं 1, तृतीय सिद्धी सुहास गुरव- नावळे धनगरवाडा, 200 मी धावणे: प्रथम दिप्ती शंकर सुतार- सांगुळवाडी नं 1, द्वितीय सान्वी संतोष रावराणे – सांगुळवाडी नं 1, तृतीय सिद्धी सुहास गुरव- नावळे धनगरवाडा, उंचउडी: आर्या राकेश पाटील – सांगुळवाडी नं 1, , लांबउडी: प्रथम दिशा दिपक सुतार – सांगुळवाडी नं 1, द्वितीय सान्वी संतोष रावराणे – सांगुळवाडी नं 1, तृतीय साक्षी सतीशचंद्र रावराणे- नावळे धनगरवाडा, गोळाफेक: प्रथम दिप्ती शंकर सुतार- सांगुळवाडी नं 1, द्वितीय साक्षी सतीशचंद्र रावराणे – नावळे धनगरवाडा, ज्ञानी मी होणार: प्रथम- नावळे धनगरवाडा, द्वितीय- सांगुळवाडी नं 1, समूहगान: प्रथम- सांगुळवाडी नं 1, द्वितीय- नावळे धनगरवाडा, समूहनृत्य: प्रथम- सांगुळवाडी नं 1, द्वितीय- नावळे धनगरवाडा याप्रमाणे सहभागी शाळा संघ व विद्यार्थी यांनी यश मिळविले. या स्तरावरील विजेते स्पर्धक संघ व खेळाडु प्रभागस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व यशस्वी शाळांचे, विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page