निरवडे येथील केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव-शारदा विद्यालय शाळेचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१४.-: निरवडे शाळा नं. १ येथे पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव-रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश मिळवले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात समुहनृत्यामध्ये मळगाव रस्ता शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच सांघिक खेळात रिले मुलगे प्रथम क्रमांक, कबड्डी मुलगे प्रथम क्रमांक, कबड्डी मुली प्रथम क्रमांक, खो-खो मुलगे प्रथम क्रमांक, खो-खो मुली द्वितीय क्रमांक प्राप्त करत शाळेला यश संपादन करून दिले. तसेच यावेळी घेतलेल्या वैयक्तिक खेळात दशरथ पंढरीनाथ गावकर लांब उडी तृतीय क्रमांक, अनुष्का सूर्यकांत गावडे १०० मीटर धावणे तृतीय क्रमांक, दशरथ पंढरीनाथ गावकर ५० मीटर धावणे द्वितीय क्रमांक, ओम मदन शिरोडकर उंचउडी द्वितीय क्रमांक यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा शिक्षकवृंद मुख्याध्यापक अनुराधा सुर्वे, सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, सच्चीदानंद मेस्त्री, माधवी शिरोडकर, विजय ठाकूर, पालक आनंद शिरोडकर, अनुष्का शिरोडकर, मदन शिरोडकर, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page