स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी जितेंद्र पंडित…

सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी होणार फायदा

⚡सावंतवाडी ता.१४-: स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी येथील सुंदरवाडी हेल्पलाइन फाऊंडेशनचे सचिव तथा पॉम्पस हॉटेलचे मालक जितेंद्र उर्फ जितू पंडित यांची निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे.


केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने स्वदेश दर्शन वीस ही योजना जाहीर करण्यात आली होती. या स्वदेश दर्शन योजनेसाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये पंडित यांना सदस्य पद मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक समितीमध्ये ते असून सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी ते कार्यरत आहेत.

You cannot copy content of this page