⚡देवगड ता.१४-: आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा द्वितीय वर्धापन दिन रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २.00 वाजता बाळूमामा मंदीर दाभोळे कोंडामा येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून बायर क्राॕप सायन्स इंडीया यांच्या वतीने आंबा पिक संरक्षण मार्गदर्शन सत्र तसेच वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन करणेत आले आहे.. तरी सर्व शेतकरी बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात येत आहे.आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड.
