तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम तळगावकर: उपस्थितांकडून शुभेच्छा..
⚡मालवण ता.१४-: मालवण वायरी येथील श्री रेकोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, वायरी- मालवणच्या चेअरमनपदी मनोज लुडबे, तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम (संदेश) तळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
या दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. संचालक संजय लुडबे, हनुमंत लुडबे, उदय तळगावकर, जयवंत लुडबे, संतोष लुडबे, गणेश प्रभुलकर, देवानंद लुडबे, श्रमिका लुडबे, संजीवनी लुडबे, संस्था सचिव संजय देऊलकर आदी उपस्थित होते.
