⚡कणकवली ता.१४-: ओ.बी.सी. व आरक्षित समाज महासंघातर्फे कणकवली उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या कणकवली,देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची लेखी परिक्षा येत्या रविवारी होणार आहे. उमेदवारांकडून या परिक्षेची पुर्वतयारी करून घेण्यासाठी आरक्षित महासंघा तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मोफत आयोजनकरण्यात आले आहे. ही कार्यशाळा शुक्रवार १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३०ते सायं.४.३०.या वेळात वाळकेश्वर मंगल कार्यालय,मुडेडोंगरी येथे होणार आहे.
सदर पोलिस पाटील पद भरतीसाठीच्या लेखी परिक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिका सोडवितांना घ्यावयाची काळजी,अपेक्षित प्रश्न या विषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त गट विकास अधिकारी विजय चव्हाण,निवृत्त नायब जिल्हाधिकारी अरविंद वळंजू ,निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर , मा.दत्ताजी गायकवाड (क.प्र.अधिकारी,जि.प.सिंधुदुर्ग),आणि पोलीस पाटील संघटनेचे अनुभवी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनाही महासंघातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.
कणकवली रेल्वे स्थानका नजिकच्या वाळकेश्वर मंगल कार्यालय,मुडेडोंगरी येथे शुक्रवार १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३०ते सायं.४.३० या वेळात आयोजित ही पोलीस पाटील परिक्षा पुर्वतयारी कार्यशाळा अर्ज दाखल केलेल्या सर्व परिक्षार्थींसाठी खुली व मोफत आहे.या कार्यशाळेचा लाभ घेऊन परीक्षेत उज्वल यश संपादन करावे,असे आवाहन ओ.बी.सी. व आरक्षित समाज महासंघ अध्यक्ष
नितीन वाळके,कार्याध्यक्ष
चंद्रशेखर उपरकर ,रमण वायंगणकर ,महासचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
