अशोक दळवी: उर्वरित शेतकऱ्यांची देखील नुकसान भरपाई लवकरच जमा होणार..
⚡सावंतवाडी ता.१४-:
अवकाळी पाऊस व वादळाने नुकसान झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये, सांगेली, सावरवाड सहयाद्री पट्टयातील ३२२ शेतक-यांना १३ लक्ष ५२ हजार नुकसान रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेली असून, उर्वरीत शेतक-यांची नुकसान भरपाई लवकरच बँक खात्यात जमा होणार असल्याची माहीती शिंदे शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यातील ३८ शेतक-याचे शेती/ बागायतीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यापैकी ६ शेतक-यांना २२ हजार ७७५ नुकसान रक्कम शेतक-यांच्या खाती जमा झालेली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून ही नुकसान भरपाई मिळाल्याचे ते म्हणाले.
