क्रिडा महोत्सवात बांदा केंद्र शाळेला सर्व साधारण विजेतेपद…

⚡बांदा ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बांदा केंद्रस्तरीय बाल कला ,क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जिल्हा परिषद बांदा नं.१शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
विलवडे नं.१ शाळेच्या पटांगणात मैदानी स्पर्धा तर बांदा केंद्र शाळेत समुह गीत , समुह नृत्य ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न झाल्या.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात बांदा केंद्रातील १५शाळा सहभागी झाल्या होत्या . यामध्ये बांदा केंद्र शाळेने सर्वाधिक गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले तर विलवडे नं.१शाळेला उपविजेतेपद मिळाले.
बांदा नं.१शाळेने लहान गटात मुलगे- खो-खो प्रथम ,कब्बडी प्रथम, समुह नृत्य प्रथम ,मुली खो-खो प्रथम,रिले प्रथम मोठा गट मुलगे खो-खो प्रथम,रिले द्वितीय ,मुली कब्बडी प्रथम, खो खो द्वितीय, रिले द्वितीय ,समुह नृत्य द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
वैयक्तिक लहान गटात– दुर्वांग मांजरेकर ५०मी धावणे द्वितीय, लांब उडी दुर्वांग मांजरेकर तृतीय,चैताली वडर १००मी धावणे प्रथम, बुशरा खान उंचउडी प्रथम, चैताली वडर लांबउडी द्वितीय, मोठा गट– १००मी धावणे यल्लापा करंबळकर द्वितीय, अर्पण सावंत २००मी धावणे प्रथम, उंचउडी यल्लापा करंबळकर द्वितीय,लांबउडी साहिल साळुंखे द्वितीय,१००मी धावणे युतिका बांदेकर द्वितीय , उंच उडी रोहिणी चव्हाण तृतीय ,लांबउडी सनिमुनिशा खान तृतीय ,गोळा फेक त्रिशा गावडे तृतीय यांनी सुयश प्राप्त केले.ज्ञानी मी होणार या स्पर्धेत लहान गटात दुर्वा नाटेकर व स्वरा बांदेकर यांनी प्रथम,तर मोठ्या गटात आर्या शिंगाडे व शिवानंद परब यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख संदीप गवस व मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये पदविधर शिक्षिका स्नेहा घाडी , रंगनाथ परब, शांताराम असनकर,जे.डी.पाटीर,प्रदिप सावंत,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,सपना गायकवाड,जागृती धुरी ,मनिषा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page