बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१४-: बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी देवदीपावलीला हा कार्यक्रम केला जातो. शेकडो भाविकांनी पेटविलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर लख्ख उजळून गेला होता.
बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, गुरुनाथ सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सौ. रेश्मा सावंत, गजानन गायतोंडे, अवंती पंडित, उमेश मोर्ये, गजानन मोर्ये, ज्ञानेश्वर सावंत, राजा सावंत, दादा सावंत, निलेश कदम, उमांगी मयेकर, आदिसह देवस्थानचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने बांदेश्वर भूमिका मंदिर परिसरात दिप प्रज्वलीत केले.
श्री बांदेश्वर भक्त महिला सेवेकरी मंडळींनी दिवे भरुन देण्याचे काम केले तसेच मंदिरासमोर सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. श्री बांदेश्वर भुमिका मंदिराचा परिसर दिव्यांच्या तेजाने उजऴून गेला होता.
फोटो :-
बांदा येथे श्री बांदेश्वर मंदिर येथे दीपोत्सवाचे दीप प्रज्वलीत करून उदघाट्न करताना पोलीस निरीक्षक शामराव काळे. सोबत बाळु सावंत व इतर मान्यवर. तर दुसऱ्या छायाचित्रात दीपोत्सवत दिवे पेटविताना भाविक. (छायाचित्रे- निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page