⚡बांदा ता.१४-: खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा आणि इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन “रंगशिशिर”चे आयोजन १८ व १९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
बांदा हायस्कूलच्या पटांगणावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले, संस्थाध्यक्ष कल्पना तोरसकर, उद्योजक जयंत म्हावळणकर, जयकुमार पारिपत्ये, शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी १८ रोजी माध्यमिक विभाग आणि इंग्लिश मीडियम स्कुल तर १९ रोजी उच्च माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
