निबंध स्पर्धेत स्वरा सातार्डेकर प्रथम…

मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयच्या वतीने आयोजन..

⚡बांदा ता.१४-: मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या दत्ताराम सडेकर पुरस्कृत शालेय निबंध स्पर्धेत दिव्य ज्योती स्कुल बांदाच्या स्वरा समीर सातार्डेकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत वैष्णवी अशोक वाडकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. श्रेया प्रेमनाथ मांजरेकर (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, नेमळे) व हंसिका शामसुंदर मांजरेकर (श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सिया नामदेव नाटेकर (मळगाव इंग्लिश स्कुल, मळगाव) व हिमांशू अरुण रेडकर (खेमराज हायस्कुल, बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पारितोषिक वितरण शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी १० वाजता (स्व.) डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयचे अध्यक्ष हेमंत खानोलकर यांनी केले आहे.
You cannot copy content of this page