⚡वेंगुर्ला ता.१४-: सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्रीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील पश्चिम घाट, पश्चिम किनारा आणि समुद्रकिनारी असलेल्या बेटांवर भारतीय स्विफ्टलेटचे संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. वेंगुर्ला खडकातील इंडियन स्विफ्टलेटवरील त्यांचे संशोधन विशेष आणि प्रशंसनीय आहे.
अशाप्रकारे, वेंगुर्ला समुदायामध्ये जागृती करण्यासाठी असे प्रयत्न वेळोवेळी होत राहिले पाहिजेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह येथे माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद आणि बॅ.खर्डेकर महाविद्यालय तसेच राऊंड ग्लास स्टेशन आणि सॅकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रवेश निःशुल्क असून विद्यार्थ आणि नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
