सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…

जयेंद्र परुळेकर: मंत्री केसरकर व आमदार राणे यांची आरोग्यमंत्र्यांची बैठक ही केवळ दिखावा..

⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन केवळ दिखावा केला आहे जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर देवेंद्र परुळेकर यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत रुग्णालयामध्ये औषध साठा नाही जनतेला बाहेरून औषधे आणावी लागत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे हाफकीन विचारतात यावरून त्यांची वृत्ती दिसून येते ते खरं डॉक्टर आहेत का असा प्रश्न निर्माण होतो ते जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची समस्या काय सोडवणार असा सवालही डॉक्टर परूळेकर यांनी केला

You cannot copy content of this page