सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी ही भाजपलाच मिळावी ही कार्यकर्त्यांकडूनच मागणी…

राजन तेली: जिल्ह्यातील आरोग्य बाबतचे प्रश्न डिसेंबर अखेरपर्यंत सुटतील…

⚡सावंतवाडी ता.१४-: जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेची जागा भाजपनेच लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यामुळे वरती जरी युती असली तरी पक्ष हे वेगवेगळे आहेत त्यामुळे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या विचार करून उमेदवारी बाबत निर्णय घेतील अशी माहिती माजी आमदार राजन तेली आणि आज येथे दिली.

दरम्यान काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे ही मागणी आमची देखील आहे त्यामुळे यासाठी वरिष्ठ स्तरावर देखील आपण पाठपुरावा करणार असल्याचे देखील श्री तेली यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडीत भाजप विधानसभा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी तेली पुढे बोलताना म्हणाले की जिल्ह्यात आरोग्या बाबत थोडी थोडी गंभीर परिस्थिती आहे.परंतु त्या समस्या लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातून बैठक घेऊन डिसेंबर अखेरपर्यंत हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असे ही श्री तेली यांनी यावेळी सांगितले..

You cannot copy content of this page