नेरूर कोलडोंगर मंदिर देवदिवाळीनिमित्त रंगला डबलबारी सामना…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ तालुक्यातील नेरूर कोलडोंगर मंदिर येथे देवदिवाळी दिनी आज बुधवार १३ डिसेंबर रोजी जत्रोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळी महाआरती आणि तीर्थप्रसाद तसेच स्थानिक भजने पार पडली. तसेच सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत आणि प्रसिद्ध बुवा दिनेश वागदेकर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगला. या डबलबारी भजनी सामन्याचे उद्घघाटन शिवसेना पदाधिकारी रुपेश पावसकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, मुख्यमंत्री मदतनीस कक्ष तालुकाप्रमुख अरविंद करलकर, नेरूर देवस्थानचे मानकरी दाजी गावडे, सुधाकर नेरुरकर, प्रसाद मेस्त्री, पोलीस पाटील मेस्त्री, निलेश मेस्त्री, नितेश नेरुरकर, अनिकेत नेरुरकर, विजय नेरुरकर, अरविंद नेरुरकर, प्रसाद पोईपकर, गणेश मेस्त्री आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच रात्री खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न झाला.

You cannot copy content of this page