जयेंद्र परुळेकर-:केसरकरांची वागणूक म्हणजे “कामापुरती मामा”..
⚡सावंतवाडी ता.१४-: बाळासाहेबांची वागणूक ही हुकूमशाही पद्धतीने होती असे म्हणणारे दीपक केसरकर हे भविष्यात भाजपच्या नेतृत्वावर ही टीका करताना दिसतील अशी टीका ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास हा भाजपच्या दिशेने सुरू आहे. ते आगामी निवडणूक ही भाजपकडूनच लढतील त्यामुळे त्यांची ही वागणूक नेहमीच कामापुरती मामाच राहिली असल्याचा टोला देखील श्री परुळेकर यांनी यावेळी लगावला आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
