वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र 16 रोजी मोफत मोती बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर…

‌‌

⚡वैभववाडी ता.१३-: युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मोती बिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख- संदेश पारकर , विधानसभा प्रमुख – सतीश सावंत विधानसभा संपर्कप्रमुख -अतुल रावराणे , युवासेना जिल्हाप्रमुख- सुशांत नाईक ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख – नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे, तालुका प्रमुख -मंगेश लोके उपस्थित राहणार आहेत.
*तरी शिवसेना ,युवासेना, महिला आघाडी यांच्या सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान युवा सेनेचे जिल्हाचिटणीस- स्वप्निल यांनी केलं आहे.

You cannot copy content of this page