⚡बांदा ता.१३-: राधारंग फाऊंडेशनच्या वतीने येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वरचित काव्यावचन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक- वेदा प्रवीण राऊळ ( जि प शाळा नंबर ४ सावंतवाडी) रोख रुपये १५०० चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक- श्रुती शिवाजी पोपकर (नूतन माध्यमिक शाळा इन्सुली) रोख रुपये १००० चषक व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक - नैतिक निलेश मोरजकर (खेमराज मेमोरियल स्कूल बांदा) रोख रुपये ७०० चषक व प्रशस्तीपत्र, चौथा क्रमांक- दामिनी मिलिंद देसाई (माड्याची वाडी हायस्कूल), रोख रुपये ५०० चषक व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ- समृद्धी जयराम देसाई (माध्यमिक विद्यालय डेगवे सावंतवाडी) रोख रुपये ५०० व प्रशस्तीपत्र. यांनी यश मिळविले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक अन्वर खान, नट वाचनालय अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन हेमंत खानोलकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. या स्पर्धेत एकूण २४ स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.
या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण विठ्ठल कदम व मनोहर परब यांनी केले. राधारंगच्या या संपन्न झालेल्या काव्यवाचन स्पर्धेला तसेच भविष्यात होणाऱ्या सर्व उपक्रमांना प्रकाश पाणदरे यांनी रोख रुपये पंचवीस हजार देणगी दिली.
या कार्यक्रमासाठी राधारंग फाउंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद देसाई, सचिव सौ पुर्वा नाईक, सदस्य प्रथमेश नाईक, सौ. अरुणा सामंत, दीपक सामंत, श्री गुरुनाथ नार्वेकर, श्री कमलाकर धुरी, राजन नाटेकर आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत राधारंगचे उपाध्यक्ष ॲड. पी. डि. देसाई यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केले.
