शेतकऱ्याची कृषी व विमा प्रतिनीसोबत बैठक , भरपाई न मिळाल्यास आंदोलन छेडणार..
⚡सावंतवाडी ता.०८-: पावसामुळे काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले असतांना माडखोल मंडळ सावंतवाडी मंडळाशी जोडल्याने शेतकरी काजू पिक विमा पासून वंचित राहीले त्यामुळे माडखोल मंडळ पूर्वीप्रमाणे आंबोली मंडळाची जोडून सन 2022 – 23 ची नुकसान भरपाई आंबोली मंडळाप्रमाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे या संदर्भात येत्या सोमवारी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.
काही झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न राहणार असून प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका ही घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.