कणकवलीत भाजपा युवा मोर्चाच्यावतीने जोडे मारो आंदोलन..
⚡कणकवली ता.०७-: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह आणि बेजबाबदार विधान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र कर्नाटक राज्यसरकार मंत्री प्रियंक खर्गे यांचा कणकवलीत भाजप युवामोर्चाच्या वतीने जोडो मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप मेस्त्री निषेध व्यक्त करताना म्हणाले , काँग्रेस सरकारची सत्ता कर्नाटक राज्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला, आज विधानभवनातील वीर सावरकरांचे तैलचित्र हटवण्याची मागणी खर्गे यांनी केली व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय असे प्रश्न विचारत आपले अज्ञान पाजळत अपमान केला. त्याचा महाराष्ट्र राज्यभर युवमोर्चाच्या वतीने निषेध केला जात असून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने तिन्ही विधानसभेत जोडो मारो आंदोलन केले जाणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, सोशल मीडियाचे समीर प्रभूगावकर, सुभाष मालंडकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, राजू हिर्लेकर, शिवा राणे, सदा चव्हाण, प्रशांत राणे, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर, लवू परब, प्रसाद देसाई, अभी देसाई, रोहित ठाकूर उपस्थित होते.