तिलारी घाटात बोलेरो पिकपला अपघात…

ताबा सुटल्याने संरक्षक भिंतीवर दिली जोरदार धडक: चालक गंभीर जखमी..

⚡दोडामार्ग ता.०७-: महाराष्ट्र गोवा कर्नाटक यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या तिलारी घाटात अपघातांचे सत्र सुरूच असते यातच आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा तिलारी घाटात दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या टॉमॅटो वहतूक करणाऱ्या ( के ए 32 ए ए 6700) या महिंद्रा पिकप चा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यांच्या बाजुला असलेल्या संरक्षक भिंतीवर जोरात धडक बसल्याने हा अपघात झाला.

यात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेलेल्या संरक्षक भिंतीचे तडे गेले आहेत. अपघात स्थळी उबाठा शिवसेनेचे सोशल मिडिया तालुका प्रमुख संदेश राणे व ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य केले.

तिलारी घाटात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सोशल मीडिया तालुकाप्रमुख संदेश राणे यांनी केला आहे.

You cannot copy content of this page