बंदर विभागाकडून चार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र सागरी मंडळाने मालवण बंदर निरीक्षक कार्यालयासमोरील प्रशस्त वाहनतळ, बंदर टर्मिनस आणि परिसरातील मालमत्तेच्या देखरेखीसाठी चार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना हजर करून घेण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून बंदर निरीक्षकांना देण्यात आले असून ते चोवीस तास सेवा बजावणार आहेत.

मालवण बंदर विभाग कार्यालयासमोर प्रशस्त वाहनतळ, बंदर टर्मिनस आणि आजूबाजूच्या परिसरातील जागेत कुणीही अतिक्रमण करू नये, याकडे सुरक्षा रक्षकांचे विशेष लक्ष असणार आहे. मोकळ्या जागांमध्ये यापुढे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, याची विशेष खबरदारी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून घेतली जात असल्याचे दिसते. प्रशस्त वाहनतळासाठी निविदा प्रक्रिया होण्यापूर्वी बंदर विभागाकडून वाहनतळाच्या ठिकाणी पाच गेट घातले जाणार आहेत. जेणेकरून पार्किंगसाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून ठेकेदारास प्रत्येक वाहनावर प्रवेश कर आकारणी सुलभ होऊ शकेल.

You cannot copy content of this page