मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक…

प्लास्टिक सदृश तांदळाबाबत विचारला जाब:नमुने तपासणीसाठी पाठवण्याची तहसीलदार यांनी दिली ग्वाही …

⚡सावंतवाडी ता.०७-: येथील तालुक्यातील रेशन दुकानात मोफत व अल्प दरात पुरवठा करत असलेल्या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला धडक देत जाब विचारला. दरम्यान पुरवठा अधिकारी यांनी हा तांदूळ प्लास्टिकचा नसून 45 प्रोटीन युक्त तांदूळ असल्याचे सांगितले. हे तांदूळ खाण्यायोग्य असल्याचे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. तसेच तहसील कार्यालयामार्फत सुद्धा हे तांदूळ नमुने तपासणीसाठी पाठवण्याची ग्वाही सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

तालुक्यातील रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. परंतु या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आले. त्यामुळे आरोस, तिरोडा, नाणोस शेर्ले, माडखोल, इन्सुली, न्हावेली आदी भागातून बऱ्याच लोकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदार कार्यालय धडक देत संबंधित पुरवठा अधिकारी तसेच तहसीलदार यांची भेट घेऊन जाब विचारला. दरम्यान हे तांदूळ नमुने तपासणीसाठी पाठवण्याची ग्वाही सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांनी दिली.

यावेळी विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार, मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदेश सावंत, सुरेंद्र कोठावळे, विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी,नंदू परब, प्रणित तळकर,दिलीप नाईक, गुरुनाथ नाईक, व इतर मनसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page