युवक काँग्रेसच्या मालवण तालुकाध्यक्षपदी श्रेयस माणगावकर…

⚡मालवण ता.०७-: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस मालवण तालुकाध्यक्ष पदी श्रेयस माणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे युवक काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी जयदीप थोरात यांच्या हस्ते श्रेयस माणगावकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चिब व अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहप्रभारी एहसान खान उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदार संघात सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. यावेळी श्रेयस माणगावकर यांची युवक काँग्रेस मालवण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोकण विभाग संघटक प्रमुख प्रभात झा, सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी जयदीप थोरात, सचिव सिद्देश परब, सचिव अरविंद तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्ष किरण टेंबुलकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page