राज घराण्यांकडून राजवाडा नजीकची धोकादायक झाडे तोडली….

सामाजिक बांधिलकीसह टेम्पो मालक संघटनेने मानले आभार; नागरिकांनी वेधले होते लक्ष..

⚡सावंतवाडी ता.०५-: येथील राजवाडा परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादाय झाड अखेर तोडल्याने वांधारकांचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.याबाबत सामाजिक बांधिलकीच्या वतीने येथील राजवाड्याचे युवराज लखम राजे भोसले यांचे धोकादायक असलेले झाडांबाबत लक्ष वेधले होते अखेर ती धोकादायक झाडे तोडल्याने सामाजिक बांधिलकी व टेपो चालक-मालक संघटनेने श्री. लखन राजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती आशी की तीन महिन्यापूर्वी राजवाडा येथे रस्त्यावर पावसामध्ये भले मोठे झाड पडून दोन तरुणांचा नाक बळी गेला होता त्यामुळे सावंतवाडी शहर हा पूर्णपणे हादरून गेला होता त्यामुळे त्या परिसरात असलेले धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांचे नागरिकांमधून होत होते अखेर त्याची दखल घेऊन ती धोकादायक तोडण्यात आल्याने नागरिकांसह टेम्पो मालक संघटना व सामाजिक बांधिलकीच्या वतीने श्री लखन राजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page