अन्यथा आंदोलन; मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा..
⚡सावंतवाडी ता.०१-: शहरातील दुकानावरील पाट्या मराठीत करा,अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन इशारा दिला आहे.
दरम्यान शहरातील अनेक दुकानावरील बोर्ड हे मराठीत नसून हे इंग्लिश मध्ये आहेत ,त्यामुळे त्यांना तात्काळ आदेश देऊन हे दुकानावरील पाट्या मराठीत करून घ्या असेही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारांची भेट घेऊन लक्ष वेधले.
