अमित सामंत:आता गद्दार, अप्रामाणिक यांच्यावर विश्वास नको.;घारेंना वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव..
⚡सावंतवाडी ता.०१-: आपल्याला पुढील काळात पुन्हा एकदा हा मतदारसंघ रुजवायचा आहे. गद्दारांना व अप्रामाणिकाना स्थान द्यायचं नसून अर्चना घारेंसारख्या नेतृत्वाला संधी देऊन पुढील वाढदिवस हा आमदार म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे, असे आशावादी उद्गार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे काढले. दरम्यान सावंतवाडी मतदारसंघाचे नाव राज्याच्या विधानसभेत आदराने घेतले गेले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला काम येणाऱ्या काळात करायचं आहे असे आवाहनही श्री सामंत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
सौ. घारे यांचा वाढदिवस उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी सामंत पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येकाने जर आपण आमदारकीला उभा आहे, असं समजून काम केलं पाहिजे. आपण सर्वांना एकत्र घेऊन जाऊन मतदार संघात आपला आमदार करू असे प्रत्येकाने ठरविले पाहिजे अशा कानपिचक्या देखील श्री सामंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान अर्चना घारे ह्या गेले अनेक वर्ष खूप चांगले चांगले उपक्रम राबवत आहेत. राजकीय पेक्षा सामाजिक उपक्रमात त्यांनी जास्त भर दिलाय. त्यामुळे नक्कीच त्यांचे कार्य हे समाजाला एक आदर्श घडवणारे आहे असे गौरोउद्गार देखील श्री.सामंत यांनी यावेळी काढले.श्री.सामंत सौ घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर बोलत होते.
