वाचन हे सांगून होत नाही तर रक्तात भिनाव लागत…

शेखर सामंत: अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०१-: राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे राजकारणी कमी दिसतात. अर्चना घारे या त्यातील एक आहेत. लोकांमध्ये त्या असतात त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांच्या बोलण्यातून राजकारणातून लुप्त होत चाललेला सुसंस्कृतपणा दिसतो. वाचन हे सांगून होत नाही ते रक्तात भिनाव लागत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमातून एक विचार दिसतो. समाजात वाचाल तरचं वाचाल अशी परिस्थिती आहे‌. आज सिंधुदुर्गला वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे असं मत व्यक्त करत घारे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.अर्चना फाऊंडेशनच्यावतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्यानं भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, साहित्यिक प्रा. गोविंद काजरेकर, साहित्यिका डॉ. शरयु आसोलकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सामाजिक कार्यकर्ते अँड नकूल पार्सेकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, संदीप घारे,रेवती राणे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, पुजा दळवी, हिदायत खान, सावली पाटकर, बावतीस फर्नांडिस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी शुभेच्छा देत असताना, शरद पवार यांची निवड चुकत नाही. सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी अर्चना घारे-परब यांची केलेली निवड योग्य आहे. त्यांच सामाजिक कार्य राजकारणात प्रेरणा देणार आहे असं मत व्यक्त केलं.

You cannot copy content of this page