मंत्री केसरकर आता चौथ्यांदा आमदार काय , नगरसेवक म्हणून निवडून येऊन दाखवावे…

चंद्रकांत कासार यांचे आवाहन; शिक्षकांचा अपमान म्हणजे सावंतवाडीतील सुसंस्कृत लोकांचा अवमान..

सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी मतदारसंघातील तुमची लोकप्रियता कमी झाल्याने आता तुम्ही आमदार सोडा आता साधा नगरसेवक सुद्धा म्हणून निवडून येऊ शकत नाहीत., अशी टीका उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आज येथे केली.दरम्यान बीड येथील बीएड बेरोजगारांचा केलेला अपमान म्हणजे तुम्हाला जनतेने निवडून दिलेल्या सावंतवाडी मतदारसंघातील लोकांचाहो अपमान केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही जाहीर माफी मागावी असे सांगत त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर जोरदार प्रहार केला ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी कासार पुढे बोलताना म्हणाले की मंत्री केसरकर यांना सत्तेचा माज आल्याने ते बेताल वक्तव्य करत आहेत एका सुसंस्कृत सावंतवाडी मतदारसंघातले नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला हे अजिबात शोभत नाही त्यामुळे मंत्री केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी मतदारसंघातील लाच संपूर्ण महाराष्ट्रात घालवली आहे अशी टीका देखील कासार यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page