मुकेश खोबरेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप…

⚡बांदा ता.२८-: येथील मुकेश खोबरेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या भावनेतून आपल्या मित्रमंडळींसह पणदूर येथील सविता आश्रमास भेट देवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत वाढदिवस साजरा केला.
श्री खोबरेकर यांचा वाढदिवस आश्रमातील उपस्थित्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. यावेळी साईनाथ धारगळकर, संदीप नार्वेकर, विराज नेवगी, रोहिदास कळंगुटकर -देसाई, अमित महाले, तुषार मोरे, रविकिरण मावळणकर आदी उपस्थित होते.
खोबरेकर आणि मित्रमंडळींनी दिलेल्या मदतीबद्दल आश्रमाच्यावतीने व्यवस्थापक संदीप परब यांनी आभार व्यक्त केलेत. यावेळी दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू आणि धान्य देण्यात आले. या सामाजिक कार्यासाठी उद्योजक भाऊ वळंजू, त्यांचे कर्मचारी, सिद्धेश वेंगुर्लेकर, शरदचंद्र महाबळ, मेलवीन डिसिल्व्हा, सौ. आर्या लोलगे, दयानंद नेवगी, गजानन पावसकर यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page