सावंतवाडी
शिंदे गटात गेलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात त्याच्या निवासस्था समोरुन मोर्चा काढत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह तब्बल 12 जणांची आज येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या कामी ॲड. नीलिमा गावडे, ॲड. पंकज आपटे,ॲड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांसह आमदार वैभव नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत 27 जून 2022 रोजी शहरातील गवळी तिठा ते गांधी चौक असा मोर्चा काढला होता. मात्र यादी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता मनाई आदेश लागू केला होता परंतु हा आदेश झुडकारत पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रमाणे आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हाध्यक्ष संजय पडते,संदेश पारकर, सतीश सावंत, रुपेश राऊळ, विक्रांत सावंत, चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, गुणाजी गावडे,रिमेश चव्हाण, योगेश नाईक यांच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी येथील कोर्टात दावा सुरू होता. आज या प्रकरणी सुनावणी होऊन येथे न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
