कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन*
*💫सावंतवाडी दि.१२-:* उपजिल्हा रुग्णालयाचे कॉर्पोरेट लुक देण्याचे रखडलेले काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तशा सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या असल्याचेही त्यानी यावेळी स्पष्ट केले आहे. या कामाबाबत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
