आंबोली फौजदारवाडी येथील घटना:
वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले…
⚡आंबोली,ता.१७-: येथील फौजदारवाडी येथे कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाला वाचवले.वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले.
आज येथील फौजदारवाडी येथे सायंकाळी ४ च्या दरम्यान हिरण्यकेशी नदी पात्रातील गणेश कोंड येथे एक महिनाभराच्या सांबराच्या पिल्लाला ओरबडत हल्ला करताना तेथील युवकांनी त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.यावेळी प्रथमेश गावडे,विष्णू सावंत,रोहन गावडे,वैष्णवी गावडे,संजय गावडे, प्रसाद शिरोडकर यांनी त्या पिल्लाला सोडवले.यानंतर येथील वनविभागाला कळवण्यात आले.त्यांनी नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.
