जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयात शुकशुकाट…

⚡सिधुदुर्गनगरी १७-: दीपावली नरकचतुर्थी , भाऊबीज सणाच्या अनुषंगाने गेले आठ-दहा दिवसात काहीदिवस कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे परजिल्हयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या सुट्ट्यांना जोडून रजा घेतल्यामुळे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद सह प्रशासकीय कार्यालयांमध्ये दीपावली सणाचे सावटशुकशुकाट जाणवत आहे .

दिवाळी हा महत्त्वाचा सण मानला जातो गणेशोत्सवा नंतर दीपावली पाडवा या सणाला राज्यभरात महत्त्व आहे दिवाळीच्या या सणाच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात व त्या आधी दोन दिवस सुट्ट्या व त्यामधील कालावधीत जरी शासकीय कार्यालय सुरू असली तरी पर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या गावाला दिवाळीचा आनंद घेण्यासाठी तसेच काही कर्मचारी मुंबई पुणे व अन्य ठिकाणी गेल्यामुळे अद्यापही प्रशासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे त्याचबरोबर शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या जनतेची ही वर्दळ कमी आहेया सुट्ट्या कालावधीत प्रशासकीय बैठकाही तसेच अन्य रेलचेल कमी असल्यामुळे जनतेचीतसेच जिल्हा नियोजन ची बैठक लाबल्यामुळेनवीन विकास कामे सुरू नाहीत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सह काही विभागात वर्दळ दिसत नाही दीपावली पाडवा सण महत्त्वाचा सण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो असल्यामुळे अनेक विद्यार्थी दीपावली सणासाठी मामाच्या गावी किंवा मुंबई पुणे फिरती चा आनंद लुटण्यासाठी गेले आहे त्यामुळे प्रशासकीय कामकाजा बरोबर शिक्षणासह अन्य विभागातही वर्दळ कमी दिसत आहे उद्याच्या शनिवार रविवार नंतर खऱ्या अर्थाने प्रशासकीय कामकाजाला सुरुवात होणार आहे सोबत फोटो

You cannot copy content of this page