पोलीस घटनास्थळी दाखल: मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू..
⚡बांदा ता.१७-: लघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली धरणात सायंकाळी उशिरा स्थानिकांना पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना दृष्टीस पडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून काळोख झाल्याने व होडीची सोय नसल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढणे मुश्किल असल्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांनी सांगितले.
स्थानिक युवक आंघोळीसाठी गेले असता त्यांना खोल पाण्यात हा मृतदेह दिसला. त्यांनी याची कल्पना स्थानिकांना दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र काळोख झाल्याने व धरणातील पाणी खोल असल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढणे मुश्किल झाले आहे.
