⚡कणकवली ता.१५-: कणकवली पटवर्धन चौक येथे असणारे नगरपंचायत भाजी मार्केटमधील सर्व बंधु आणि भगिनींना, तसेच व्यापारी मित्रंडळींना संजय मालंडकर, महेश काणेकर, सुनिल काणेकर, भाई काणेकर, पी. टी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समस्त व्यापारी वर्गाला राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिपावली पाडव्याला सर्वांचे तोंड गोड केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महेश काणेकर म्हणाले, २० जानेवारीला साठावा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत, सामाजिक दृष्टीकोन जपत, तसेच लहानपणापासुनच तो आम्ही अनुभवला आहे. त्याची प्रचिती आता प्रत्येकाला येत आहेच.
गेले ८ दिवसात नगरपंचायतमधील कर्मचारी वर्गाला, सफाई कामगार, तसेच उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, इतर आणि कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासहित संपुर्ण पोलीस दलातील वाढदिवसाचे औचित्य साधुन दिपावली निमित्ताने सर्वांना भेट वस्तु देऊन तोंड गोड केले आहे.यावेळी नगरपंचायत व्यापारी बंधु आणि भगिनी उपस्थित होत्या.सुभाष उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
