वेंगुर्ला ते पंढरपूर पायी वारीचे प्रस्थान…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघणा-या पायी वारीचे प्रस्थान १४ नोव्हेंबर रोजी झाले. वेंगुर्ला बाजारपेठेतून निघालेली ही पायी वारी पहिल्या दिवशी दुपारी बिपिन वरसकर यांच्या तर रात्रौ मठ येथील सुरेश नाईक यांच्या निवासस्थानी मुक्कामास राहिली.
या पायी वारीत बहुसंख्य महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत. हरिनामाचा गजर करीत प्रस्थान केलेल्या या वारीचे मार्गात ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत होत आहे. दि. १५ रोजी सकाळी कै.चंदूशेठ बाग, दुपारी कामळेवीर, रात्रौ बबन नाईक (कोलगांव), १६ रोजी दुपारी साटम महाराज मठ, रात्रौ आंबोली, १७ रोजी दुपारी आजरा, रात्रौ निपाणी, १८ रोजी दुपारी नरसिहवाडी, रात्रौ मिरज, १९ रोजी दुपारी नागज, रात्रौ पंढरपूर, २० ते २४ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर मुक्काम असणार आहे.

You cannot copy content of this page