मोती तलाव येथे काल रात्री पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई…

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई: राजू मसुरकर यांच्या मागणीची दखल..

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील शहरात मोती तलाव येते दिवाळीनिमित्त पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर काल रात्री कारवाई करण्यात आली आहे. त्या गाड्या जप्त करून येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. दिवाळीनिमित्त मोती तलाव परिसरात मोठ्या संख्येने धूम स्टाईल बाईक स्वार हे गाडी चालवत असतात त्यामुळे पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जीवनरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन काल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस सुनील नाईक, पोलीस साटेलकर,मयूर सावंत यांनी केली.

You cannot copy content of this page