भारत-न्यूझीलंड सेमी फायनल आज:वानखेडेवर सुरू होणार थोड्याच वेळात मॅच..
⚡मुंबई दि.१५-: वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड एकमेकांना भिडणार आहेत. पहिला सेमी फायनल सामना असून जो जिंकेल तो फायनलचं तिकिट घेणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार असून दीड वाजता टॉस होत दोन वाजता सामन्याला सुरूवात होईल.दरम्यान या सामन्यात भारताकडे मागील सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी आहे.
