रिक्षाना स्टिकर लावत जनतेला प्रबोधन करण्याचा प्रयत्न*
*💫कुडाळ दि.१२-:* अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय अधिकारी-कर्मचारी यांनी आज एमआयडीसी कुडाळ येथील रिक्षा स्टँड येथे भेट देऊन माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे प्रबोधन केले व माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे लेबल रिक्षा मालक यांच्या समक्ष वाहनावर चिकटवण्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रसिद्धीच्या कृतीद्वारे ग्राहकांनी विज बिल भरून महावितरण कंपनी सहकार्य करावे याबाबत प्रबोधन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सर्वच शाखा अभियंता जनमित्र व बाह्य स्रोत कर्मचारी अशा एकूण 650 अधिकारी कर्मचारी यांना स्वतःहून वाहतुकीच्या साधनांना उदाहरणार्थ रिक्षा बस रेल्वेमध्ये लावणे शिवाय सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांना स्वतःहून विज बिल भरण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे जेणेकरून सर्व वीज ग्राहक आपली विज बिल वेळेत भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करतील.
